मी पुन्हा स्वतःकडे वळते…

सयाली असं म्हणायची..
माझं मन प्रसन्न करायचं असेल,
तर तिच्या हातात एक कागद आणि कलम द्या.

हे दिवस आठवले
आणि जाणवलं,
मी कुठेतरी हरवली आहे.

गेली कित्येक वर्षे
मी स्वतःलाच शोधत होते,
पण आज उमजलं
शोधणं गरजेचं नव्हतं.

गरजेचं होतं ते
पुन्हा त्या थांबलेल्या सयालीकडे
शांतपणे पाहणं.

ती तिथेच उभी होती
थोडी थकलेली,
थोडी गोंधळलेली,
पण अजूनही जिवंत.

तिच्या डोळ्यांत
न लिहिलेले शब्द होते,
आणि ओठांवर
थांबलेले प्रश्न.

मी तिला शोधत नव्हते,
ती माझी वाट पाहत होती.

त्या क्षणी उमजलं

हरवणं म्हणजे नाहीसं होणं नाही,
तर स्वतःपासून थोडं दूर जाणं असतं.

मी तिच्या शेजारी बसले,
काहीही न बोलता.
आणि बर्‍याच दिवसांनी
पहिल्यांदा
स्वतःला ऐकलं.

मी शोध संपवला नाही,
मी शोध बनले.

–Sayali