
आज पुन्हा आरशात पाहिलं,
पुन्हा स्वतःला थांबलेलं जाणवलं.
तो आरसा तसाच,
मी त्या आरशाबाजूच्या भिंतीला टेकून
उभी—तशीच,
पुन्हा पुन्हा गुंतत जात होते.
मागे वळून पाहिलं तर
काही छोट्या मुंग्या चालत होत्या,
आपापलं काम करत.
शब्द फुटत नव्हते,
त्यांना काही बोलताही येत नव्हतं.
मनावर ओझं साचत असताना
हळूच नजर पुन्हा त्या आरशाकडे गेली—
वय होत जातंय,
पण मी तिथेच उभी आहे,
जिथे आधी उभी होते.
हळूच पुढे पाहिलं,
सरता सरता मुंग्याही निघून गेल्या.
मला मात्र त्या जागेवरून
हलताच येत नव्हतं.
कारण काय असावं?
स्वतःला गमावून बसलेली मी,
स्वतःला शोधण्याचा प्रयत्नही
करू शकत नव्हते.
— sayali